घोटी येथील १६ वर्षीय मुलीला शोधण्याचे घोटी पोलिसांचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज, दि. १४

घोटी येथील एक १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवून नेले आहे. ही मुलगी कोणाला आढळून आल्यास घोटी पोलीस ठाण्यात तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. कु. शबनम मोबीन इस्माल खलीफा रा. घोटी असे मुलीचे नाव असून तिचे वय १६ वर्ष ८ महिने आहे. घोटी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर ७८/२१ भादवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा २७ मे २०२१ रोजी दाखल आहे. ह्या गुन्ह्यातील अपहुत मुलगी कु. शबनम मोबीन इस्माल ही आहे. घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तरी ही मुलगी कुठे मिळुन आल्यास घोटी पोलीस ठाणे यांच्या 02553 220544 अथवा सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रद्धा गंधास यांच्या 8806122947 ह्यावर संपर्क साधावा. याबाबत आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यात सुद्धा संपर्क करता येईल.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!