इगतपुरीनामा न्यूज, दि. ०७
नाशिक जिल्ह्यातील सर्व नागरिकांना लसीकरणाचा बूस्टर डोस तात्काळ देण्यात यावा. मुलांच्या दोन डोस मधील लसीकरणाचा कालावधी कमी करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी माहिती व तंत्रज्ञान सेलचे जिल्हाध्यक्ष संकेत निमसे यांची जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की, मागील दोन वर्षांपासून कोरोनासारख्या महामारीशी आपण लढत आहोत. असे असताना नाशिक जिल्ह्यात संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका आहे. हे लक्षात घेता नाशिक जिल्ह्यातील तालुका, गावपातळीवर लसीकरणाचा वेग वाढवून सर्व सामान्य नागरिकांना बूस्टर डोस तात्काळ देण्यात यावे. त्याचप्रमाणे 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणातील दोन डोस मधील कालावधीत कमी करण्यात यावा. त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण होवून कोरोना, ओमायक्रॉंनचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. त्यामुळे आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवणार नाही. यामुळे मृत्यूचे प्रमाण रोखले जाण्यास साहाय्य होईल. म्हणून सर्वसामान्य नागरिकांना बूस्टर डोस देण्यास तात्काळ मान्यता देण्यात यावी अशी मागणी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस माहिती व तंत्रज्ञान सेलचे वतीने करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस माहिती व तंत्रज्ञान सेलचे जिल्हाध्यक्ष संकेत निमसे, उपाध्यक्ष प्रतीक रायते, गौरेश सूर्यवंशी, सरचिटणीस अनिल गोसावी, शुभम मुरकुटे, निखिल निकम, चिटणीस विशाल लभडे, सागर दरेकर, तुषार सानप, संघटक सचिव अक्षय मोरे, बागलाण तालुकाध्यक्ष प्रितेश भदाणे, निफाड पूर्व तालुकाध्यक्ष प्रमोद कदम, येवला तालुकाध्यक्ष नारायण गुंजाळ आदी उपस्थित होते.