शिवरायांचे गडकिल्ले ग्रुपकडून रामशेज किल्यावर दीपोत्सवाने नववर्षाचे स्वागत

इगतपुरीनामा न्यूज, दि. १

इगतपुरी तालुक्यातील शिवरायांचे गडकिल्ले ग्रुप हा गेल्या ३ वर्षापासुन इग्रंजी नववर्षाच्या स्वागतासाठी छत्रपती  शिवरायांच्या गडकिल्ल्यावर जाऊन तिथे रात्रभर मुक्कार करतात. रात्रभर सर्व साफसफाई करून भव्य दीपोत्सव, रांगोळी, शिवरायांच्या स्मारकाला अभिषेक करून रात्री १२ ला आरती करतात. यासह शिवरायांच्या स्मारकाला फुलांनी सजावट करून नववर्षाचे जंगी स्वागत करण्यात येते. सरत्या वर्षाच्या दिवसांना उजाळा देण्यात येतो. नवीन वर्षाच्या सकाळी गडावर आलेल्या शिवभक्ताचे स्वागत केले जाते. खरतर सर्वजण हॉटेल, फार्म हाऊस वेगवेगळ्या पद्धतीने ३१ डिसेंबर साजरा करण्यात व्यस्त असतात. मात्र याकडे दुर्लक्ष करत वायफळ खर्चाला फाटा देत शिवरायांचे गडकिल्ले वाचले पाहिजे, साफसफाई झाली पाहिजे, गडावर कचरा टाकण्यासाठी डस्टबीनची सोय करण्यात हा ग्रुप नेहमी सक्रिय असतो. त्यामुळे ग्रुपचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.
यावर्षी रामशेज किल्यावर आत्माराम मते, वैभव दातीर, गणेश मुसळे, संदीप काजळे, संदीप बरकले, ईश्वर गवते, किरण यदे, ॠषिकेश ढिकले, आकाश मालुंजकर, यश ठोके, किरण कातोरे, गणेश शिंदे, सुनिल मोगल, सोनु गवते आदींसह अनेक शिवभक्त उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!