हरसूल येथे स्व. राहुल पांडुरंग थोरात स्मृती चषक 2021 टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धा : विनायक माळेकर यांच्या हस्ते उदघाटन संपन्न

इगतपुरीनामा न्युज, दि. 25 

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसुल बारीपाडा येथे संघर्ष क्रिकेट क्लबने आयोजित केलेल्या स्व. राहुल पांडुरंग थोरात स्मृती चषक टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन आज पार पडले. युवा नेते इंजि. विनायक माळेकर, मिथुन राऊत, हरसुलचे माजी सरपंच नितीन लाखन, उपसरपंच राहुल शार्दुल, हिरामण गावित, माजी उपसरपंच अखलाक शेख, माजी सरपंच जनार्दन पारधी, जेष्ठ नेते वामन खरपडे, सिताराम वळवी, लक्ष्मण कनोजे, नारायण आसम, संदीप धनगर, संघर्ष क्रिकेट क्लब खेळाडूंच्या हस्ते नारळ वाढवण्यात आले. यावेळी विनायक माळेकर म्हणाले की, खेळाचा आनंद घेतला पाहिजे. या भागातील खेळाडूंनी कला, कौशल्य दाखवावे. जिंकणे किंवा पराजित होणे या खेळातील दोन बाजु आहेत. परिसरातील खेळाडूंनी क्रिकेटसारख्या मैदानी खेळातून हरसुल परिसराचे नाव मोठे करावे असे आवाहन त्यांनी केले.

या स्पर्धेसाठी विनायक माळेकर यांच्याकडून प्रथम पारितोषिकासाठी 21 हजार, द्वितीय पारितोषिक हरसुलचे माजी सरपंच नितीन लाखन 15 हजार, तृतीय पारितोषिक हरसुल ग्रामपंचायतचे उपसरपंच राहुल शार्दुल 11 हजार, चतुर्थ पारितोषिक वाजिद शेख 7 हजार, पाचवे पारितोषिक अक्षय श्रीवास्तव 5 हजार, सहावे पारितोषिक सुरेश जाधव 5 हजार देणार असुन आयोजकांकडुन प्रथम चषक हेमंत मौळे ( नाशिक पोलीस ), द्वितीय चषक गिरीश भुसारे ( नाशिक पोलीस ), तृतीय चषक मोहन भोये ( नाशिक पोलीस ), चतुर्थ चषक ज्ञानेश्वर गायकवाड ( नाशिक पोलीस ), पाचवे चषक समाधान खेडुळकर ( वाघेरा ), सहावे चषक गणेश भुसारे ( महावितरण नाशिक ) मॅन ऑफ द सिरीज सुरेश अॅन्ड दिलीप पेंढार ब्रदर्स उत्कृष्ट गोलंदाज विश्वनाथ वाडगावकर ( ठाणे पोलीस) उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रोहिदास कनोजे ( ठाणे पोलीस) जनार्दन लहारे ( मुंबई पोलीस) राहुल बारगजे, भाऊराज धनगर, शरद मौळे,अंकुश भोये, गौरव वाघचौरे आदिंकडुन बक्षिसे दिली जाणार आहेत..

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!