इगतपुरीनामा न्यूज, दि. २०
नाशिक जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, नाशिक या आरोग्य कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन मधुकर आढाव यांनी चेअरमन पदाचा, श्रीकांत अहिरे पाटील यांनी व्हॉईस चेअरमन पदाचा व तुषार पगारे यांनी सचिव पदाचा राजीनामा दिल्यामुळे नव्याने चेअरमनपदी फैय्याज खान, व्हॉईस चेअरमनपदी जयंत सूर्यवंशी व सचिवपदी सुनिल जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या अध्याशी अधिकारी मनीषा खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली पतसंस्थेच्या चेअरमन, व्हॉईस चेअरमन व सचिव पदासाठी निवडणुक प्रक्रिया पार पडली. अध्यक्ष पदासाठी फैय्याज खान यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. फैय्याज खान यांच्या अध्यक्ष पदासाठी सुचक म्हणून मधुकर आढाव व अनुमोदक म्हणून श्रीकांत अहिरे पाटील यांनी स्वाक्षरी केली. उपाध्यक्ष पदासाठी जयंत सूर्यवंशी यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. जयंत सूर्यवंशी यांना सूचक म्हणुन विजय देवरे यांनी स्वाक्षरी केली तर अनुमोदक म्हणुन जयवंत सोनवणे यांनी स्वाक्षरी केली. सचिव पदासाठी सुनिल जगताप यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. सुनिल जगताप यांना सुचक म्हणुन विजय सोपे यांनी स्वाक्षरी केली तर अनुमोदक म्हणुन सुलोचना सखाराम भामरे यांनी स्वाक्षरी केली होती. विहित वेळेत चेअरमन, व्हॉईस चेअरमन व सचिव पदासाठी प्रत्येकी एक एक अर्ज आल्याने अध्याशी अधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी मनीषा खैरनार यांनी चेअरमनपदी फैय्याज खान, व्हॉईस चेअरमनपदी जयंत सूर्यवंशी तर सचिव पदासाठी सुनिल जगताप यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.
नाशिक जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे नवनिर्वाचित चेअरमन फैय्याज खान यांचे स्वागत पतसंस्थेचे माजी चेअरमन मधुकर आढाव यांनी केले. उपाध्यक्ष जयंत सूर्यवंशी यांचे स्वागत श्रीकांत अहिरे यांनी केले. सचिव सुनिल जगताप यांचे स्वागत तुषार पगारे यांनी केले. सभेचे प्रास्ताविक संस्थेचे मुख्य प्रवर्तक तथा संस्थापक अध्यक्ष जी. पी. खैरनार यांनी केले. प्रास्ताविकात खैरनार यांनी जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्था स्थापनेची व वाटचालीची माहिती विशद केली. संस्थेचा सलग ५ वर्षाचा कार्यालयीन खर्च संचालक स्वत:च्या खर्चातुन करणार असल्याचे नमूद केले. संस्थेचे नवनिर्वाचित चेअरमन फैय्याज खान यांनी नाशिक जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी पतसंस्था स्थापन झाल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांचे ३० वर्षापासूनचे स्वप्न पूर्ण होत असुन संस्था स्वमालकीच्या जागेत कार्यरत झाल्याचा आनंद आपल्या संचालक मंडळाच्या दृष्टीने सर्वात मोठा असल्याचे नमुद केले. आरोग्य पतसंस्थेचा आर्थिक कारभार यापुढेही पारदर्शक ठेऊन सर्व संचालक मंडळास विश्वासात घेऊन सभासदांच्या हित लक्षात घेऊन यापुढेही कामकाज केले जाईल अशी ग्वाही खान यांनी दिली. याप्रसंगी नाशिक जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन तथा मुख्य प्रवर्तक जी. पी. खैरनार, फैय्याज खान, मधुकर आढाव, जयंत सूर्यवंशी, सुनिल जगताप, विजय देवरे, विजय सोपे, संजय पगार, जयवंत सोनवणे, तुषार पगारे, प्रशांत रोकडे, श्रीकांत अहिरे पाटील, गोरक्षनाथ लोहकरे, सुलोचना भामरे, सोनाली तुसे, व व्यवस्थापक रामदास वडनेरे उपस्थित होते.