इगतपुरीनामा न्यूज, दि. १६
इगतपुरी तालुक्यातील वाकी ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच अनिता शिवनाथ काळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडीच्या इगतपुरी तालुकाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. ग्रामीण दुर्गम भागात राजकारण करतांना सातत्याने समाजहित आणि लोकसेवा करण्यासाठी महिला असूनही अनिता काळे यांचे योगदान अनमोल आहे. असे गौरवोद्गार राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांनी यावेळी काढले. ना. भुजबळ यांच्या हस्ते त्यांना तालुकाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, शिवनाथ काळे उपस्थित होते. अनिता काळे यांच्या माध्यमातून इगतपुरी तालुक्यातील महिलांचे संघटन आणि कार्याचा आलेख वाढणार असल्याने गोरख बोडके यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.