इगतपुरीनामा न्यूज, दि. १५
इगतपुरी तालुक्यातील अभ्यासू आणि जाणकार व्यक्तिमत्व नारायणराव वळकंदे यांची आगरी सेना इगतपुरी तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आगरी सेनेचे नेते प्रदीप साळवी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज ही सार्थ निवड करण्यात आली. नवनियुक्त तालुकाध्यक्ष नारायणराव वळकंदे यांना निवडीचे नियुक्तीपत्र राजाराम साळवी, प्रदीप साळवी, युवा नेते राहुल साळवी, मुंबई अध्यक्ष जयंद्र खूणे यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी घोटी मार्केट कमिटीचे माजी सभापती रघुनाथ तोकडे, जिल्हाध्यक्ष संपत डावखर, उपसभापती विठ्ठल लंगडे, कसारा विभाग अध्यक्ष शंकर भगत, आगरी युवा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष संतोष कडू, युवा जिल्हाध्यक्ष अनिल भोपे, कामगार तालुकाध्यक्ष विनोद भागडे, भालचंद्र भागडे, सरपंच श्याम चव्हाण, युवा आगरी सेना धनराज म्हसणे, मनीष भागडे, कार्याध्यक्ष निलेश कडू, तालुकाध्यक्ष रवी कडू, प्रदीप तोकडे, सोपान लंगडे, समाधान भागडे, आगरी युवा प्रतिष्ठानचे सदस्य, आगरी सेना सदस्य उपस्थित होते.