बिबट्याच्या हल्ल्यात २ बालके गंभीर जखमी : त्र्यंबकेश्वर जवळ कळमूस्ते दूगारवाडी येथील घटना

इगतपुरीनामा न्यूज, दि. २०

त्र्यंबकेश्वर जवळ कळमूस्ते दूगारवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात २ बालके जखमी झाले आहेत. ही घटना
आज पहाटे 6 वाजेच्या सुमाराला घडली. भिवाजी गोविंद सोहळे वय 12, विशाल सुरुम वय 8 हे दोघे पहाटे 6 वाजता लघुशंकेसाठी घराबाहेर आल्यावर बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. मात्र त्यांनी आरडाओरडा केल्याने लोकांना पाहताच बिबट्या पळून गेला. दोघांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान जखमींना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, त्र्यंबकेश्वरच्या वन विभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी आम्ही अनेक दिवसा पासून करत आहोत. मात्र त्याकडे वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असा आरोप श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस भगवान मधे यांनी केला आहे. इगतपुरी तालुक्यात बिबट्याचा हैदोस थांबला असे वाटत असतांना बिबट्याचा मोर्चा त्र्यंबकेश्वर तालुक्यात वळला असल्याचे दिसून येत आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!