वारकरी संप्रदायाचे काम समाजाला दिशादर्शक – विनायक माळेकर यांचे प्रतिपादन : वारकरी संप्रदायाचा शिवाजीनगर येथे मेळावा

इगतपुरीनामा न्यूज, दि. २०

वाघेरा गणातील शिवाजी नगर येथे वारकरी मंडळाच्या संत वारकरी मेळावा संपन्न झाला. काँग्रेसचे नेते विनायक माळेकर, मोहन बेंडकोळी यांच्या उपस्थितीत शिवाजी नगर येथे हा मेळावा उत्साहात झाला. यावेळी त्र्यंबकेश्वर तालुक्याचे नेते विनायक माळेकर व युवा नेते मोहन बेंडकोळी यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, वारकरी संप्रदाया कडुन आध्यात्मिक चिंतन, प्रवचने, किर्तने, भजन, जागर, दिंडी, काला असे धार्मिक कार्यक्रम सतत होत असतात. त्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर जनजागृती होत असते. व्यसनाच्या दुष्परिणामांचे ग्रामीण भागात समाजप्रबोधन होत असल्याने अनेक तरुणाईला व्यसनाच्या गर्तेतून बाहेर काढण्यास मदत होते. वारकरी संप्रदाय अनादिकालापासून सुसंस्कृत समाज घडविण्याचे कार्य अविरतपणे करीत आहे. वारकरी संप्रदायाला भविष्यामध्ये केव्हाही सहकार्य करण्यासाठी आम्ही नेहमीच पुढे राहु असे प्रतिपादन विनायक माळेकर, मोहन बेंडकोळी यांनी केले.

यावेळी युवा नेते मिथुन राऊत, महादेव नगरचे सरपंच विष्णु बेंडकोळी, महादेव नगरचे हभप सोमनाथ बेंडकोळी, जातेगावचे हभप महाराज पुंडलिक बाबा वाघेरे, अंबादास राऊत, हभप पोटिंदे महाराज, हभप लालु बेंडकोळी महाराज, पांडु मामा चहाळे, प्रकाश जाधव, सरपंच धनंजय बेंडकोळी, मधुकर माळेकर, भगवान महाराज, रामदास बेंडकोळी, धोंडीराम बेंडकोळी, देवचंद बेंडकोळी, संजय बेंडकोळी मोठ्या संख्येने वारकरी संप्रदायात कार्यरत असलेले नागरिक उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!