इगतपुरीनामा न्यूज, दि. १४
नाशिक मुंबई महामार्गावरील घोटी टोल नाक्यावर वाहतुकीचा पुन्हा बोऱ्या वाजला आहे. मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सुद्धा वाहनधारकांना विस्कळीत वाहतुकीचा फटका बसला होता. रोजच थोड्या बहुत प्रमाणात वाहतुकीची अडचण निर्माण होत असल्याने वाहनधारक मेटाकुटीला आलेले आहेत. टोलनाका ते घोटीच्या न्हायडी टेकडी पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. एक ते दीड किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा वाढल्या आहेत. आज रविवार असल्याने विकेंडमुळे परतीच्या वाहनांची गर्दी वाढत आहे. विस्कळीत वाहतूक वाढल्याने टोल प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. यामुळे वाहनचालकांना चांगलाच मनस्ताप होत आहे. मागच्या रविवारी सुद्धा रात्री 11 वाजेपर्यंत होती वाहतुकीच्या खोळंब्याने नागरिक वैतागले होते.