इगतपुरीनामा न्यूज, दि. २८
राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेबरोबरच हिन्दी, इंग्रजी भाषा आत्मसात करावे. सामान्य ज्ञानावर प्रभुत्व मिळवून व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करावेत असे प्रतिपादन सेव्हन महाराष्ट्र बटालियन एनसीसी नाशिक विभागाचे कमांडिंग ऑफिसर कर्नल ए. के. सिंग यांनी केले.
इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना विभाग आयोजित कार्यक्रमात कर्नल ए. के. सिंग बोलत होते. कार्यक्रमाला मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक भाऊसाहेब खातळे, प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड, सुभेदार हरीश वानिया, हवालदार नवनीत खाडे, उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, एनसीसी ऑफिसर प्रा. एस. एस. परदेशी उपस्थित होते.
कर्नल ए. के. सिंग आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, एनसीसीच्या विद्यार्थ्याना संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. त्याचा अभ्यास करून आपले करिअर घडवावे. संस्थेचे संचालक भाऊसाहेब खातळे यांनी याप्रसंगी संस्थेच्या कार्याची व शैक्षणिक प्रगतीची माहिती दिली. प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांनी महाविद्यालयात चालणारे अभ्यासक्रम आणि उपक्रमांचा आढावा घेतला. प्रा. एस. एस. परदेशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आभार प्रा. यू. एन. सांगळे यांनी मानले. याप्रसंगी कार्यक्रमाला विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.