त्र्यंबकेश्वर तालुक्यात मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम

सुनिल बोडके, इगतपुरीनामा न्यूज, दि.२८

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दुबार मतदार यांची पडताळणी करून मतदानात पारदर्शकता यावी यासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमास सुरवात होणार आहे। त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार दीपक गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तालुक्यात मतदार यादीत नव मतदार यांची नोंदणी केली जाणार असून नवे मतदार तसेच जुने मतदार यांनी मतदार यादीत आपले नाव आहे अथवा नाही याची तपासणी करून घेण्याचे आवाहन गिरासे यांनी केले आहे.या मोहिमेची सुरवात १ नोव्हेंबर पासून होणार असून ह्या कालावधीत मतदारांची नाव नोंदणी सुरळीतपणे होण्याकरीता चार दिवस विशेष मोहीम देखील राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.      

नव मतदार यांनी मतदार यादीत नाव नोंदणी करून घ्यावी. ज्या मतदारांची नावे नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील विधानसभा मतदारसंघात अथवा इतर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असतील अशा मतदारांनी स्वतःहून पुढाकार घेऊन प्रचलित नियमाप्रमाणे फॉर्म क्रमांक ७ संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून भरून द्यावेत. प्रशासनाला सहकार्य करावे.
दीपक गिरासे, तहसीलदार त्र्यंबकेश्वर

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!