वाडीवऱ्हे जिल्हा परिषद गटात साडेपाच कोटींच्या विकासकामांचे उदघाटन : नयना गावित यांच्या हस्ते उदघाटन संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०

वाडीवऱ्हे जिल्हा परिषद गटाच्या सदस्या नयना गावित यांच्या निधीतून साडे पाच कोटी रुपयांच्या विकास कामांचे उदघाटन करण्यात आले. वाडीवऱ्हे ग्रामपंचायतीने केलेल्या पाठपुराव्यामुळे नयना गावित यांच्या निधीतून ही विकासकामे करण्यात येणार आहे. यामध्ये जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी पाच कोटी रुपये मंजूर असून व्हिटीसी फाटा ते वाडीवऱ्हे गावापर्यंत 24 लाखांचा सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याचे उदघाटन व वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीसाठी 30 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे.

इगतपुरी पंचायत समितीचे सभापती सोमनाथ जोशी, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख राजाभाऊ नाठे, शिवसेना नेते रमेश गावित, सरपंच रोहिदास कातोरे, उपसरपंच प्रवीण मालुंजकर, पंडित कातोरे,कचरू डुकरे यांच्या प्रमुख उपस्थित उदघाटन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य भरत महाले, दिलीप मालुंजकर, शिवसेना गटप्रमुख दिलीप मुसळे, गणप्रमुख अंबादास धोंगडे, माजी सरपंच काशिनाथ गुळवे, पंडीत भाऊ कातोरे, माजी चेअरमन बाजीराव कातोरे, माजी सदस्य विलास कातोरे, शाखाप्रमुख नथूभाऊ कातोरे, युवा तालुकाप्रमुख संदीप गव्हाणे, रतन नाठे तसेच रस्ता कॉन्ट्रॅक्टर बोराडे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!