नाशिक जिल्हा सेवानिवृत्त सेवक असोसिएशनने दिला पाठिंबा
इगतपुरीनामा न्यूज, दि. २७
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे प्रदेशाध्यक्ष बलराज मगर हे महात्मा गांधी जयंती दिनी २ ऑक्टोबरला एक दिवसाचे आत्मक्लेश लाक्षणिक उपोषण आंदोलन मुंबई मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ करणार आहेत. महाराष्ट्रातील जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांचे वेतन व निवृत्तीवेतन दरमहा १ तारखेला होत नाही आणि ते नियमित १ तारखेलाच व्हावे यासाठी हे आंदोलन होणार आहे.
राज्यातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गासाठी सातत्याने लढा देऊन शासनाला निर्णय घ्यायला भाग पाडण्यासाठी बलराज मगर नेहमी कृतिशील असतात. त्यांच्या आंदोलनाच्या धाडसी निर्णयाचे नाशिक जिल्हा सेवानिवृत्त सेवक असोसिएशन, नाशिक ह्या संघटनेने स्वागत करून सहभाग दर्शवला आहे. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी, सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांच्या हितासाठी होत असलेल्या आत्मक्लेश लाक्षणिक उपोषण आंदोलनाला सर्वत्र राज्यभर पाठिंबा व्यक्त केला जात आहे. आहेत. नाशिक जिल्हा सेवानिवृत्त सेवक असोसिएशन, नाशिकचे अध्यक्ष उत्तम बाबा गांगुर्डे, उपाध्यक्ष रविंद्र बापू थेटे, सरचिटणीस मधुकर कांगणे, प्रसिद्धी प्रमुख सुभाष कंकरेज यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आंदोलनाला सक्रिय पाठिंबा कळवला आहे.