राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या इगतपुरी तालुका उपाध्यक्ष पदी प्रवीण खातळे

नवनाथ गायकर, इगतपुरीनामा न्यूज, दि. २१

इगतपुरी तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सक्रिय युवा कार्यकर्ते प्रविण खातळे यांची इगतपुरी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी भवन नाशिक येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी खातळे यांची निवड केली आहे.

या निवडी प्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू पा. म्हैसधुणे, इगतपुरी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष बहिरू पा. मुळाणे, इगतपुरी पंचायत समितीचे माजी उपसभापती  पांडुरंग वारुंगसे, माजी सरपंच  वसंत भोसले, निवृत्ती पाटील या सर्वांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देउन खातळे यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. सध्याच्या साठमारीच्या काळात वैचारिक अधिष्ठान असलेला एकमेव पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस असुन या पक्षाचे विचार युवकामध्यें पोहचवण्यासाठी आपण या पदाच्या माध्यमातून प्रयत्न करु असे प्रवीण खातळे म्हणाले.

Leave a Reply

error: Content is protected !!