निलेश काळे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २२
निर्वाण फाउंडेशन नाशिक यांचे वतीने देण्यात येणारा “इंटरनॅशनल आयडॉल अवॉर्ड-2021” माधुरी पाटील-शेवाळे, प्राथमिक शिक्षिका मोडाळे यांना देण्यात आला. या कार्यक्रमात त्यांच्या “मधुवेल” या पहिल्या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. मराठीचे शिलेदार प्रकाशन नागपूर यांनी या संग्रहाचे प्रकाशन केले आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत ‘आदित्य हॉल’, इंदिरानगर,नाशिक येथे संपन्न झालेल्या दिमाखदार सोहळ्यास शिल्पी अवस्थी-मिसेस इंडिया इंटरनॅशनल युनिव्हर्स क्वीन, सनासी बिडोम-आफ्रिकन तज्ञ आणि समाजसेवक, आरती हिरे-प्रसिद्ध गिर्यारोहक, विमल बोढारे-विश्वस्त -निर्वाण फाउंडेशन नाशिक, निलेश आंबेडकर, अध्यक्ष-निर्वाण फाउंडेशन, नाशिक उपस्थित होते. माधुरी पाटील-शेवाळे यांच्या यशाबद्दल त्यांचे प्रकाश शेवाळे, अशोक खैरनार, रत्नमाला खैरनार, हरिभाऊ कुलकर्णी, सिध्दार्थ सपकाळे, अंकित शेवाळे, संकेत शेवाळे, प्रवीण पाटील, राजेंद्र पाटील, राहुल पाटील, प्रतापराव शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.