९० टक्के नागरी सुविधा अभियांत्रिकी विभागाकडून दिल्या जात असल्याने अभियंत्यांची जबाबदारी मोठी :
इगतपुरी पंचायत समितीमध्ये अभियंता दिन संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५

अभियंत्यांचे प्रेरणास्थान असलेल्या भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांचा जयंतीदिन देशभरात अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त इगतपुरी पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालयात अभियंता दिन साजरा करण्यात आला. सर्व अभियंत्यांच्या हस्ते सर विश्वेश्वरय्या यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. उपस्थित अभियंत्यांना कर्मचाऱ्यांनी सन्मानित केले.

सर विश्वेश्वरय्या यांचे संपूर्ण जीवनचरित्र हे अभियंत्यांना सकारात्मक ऊर्जा देणारे असून ग्रामीण नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या साधारणत: ९० टक्के नागरी सुविधा या अभियांत्रिकी विभागामार्फत पुरविल्या जात असल्याने अभियंत्यांची जबाबदारी मोठी असल्याचे उपअभियंता प्रवीण शिरसाठ यांनी मनोगतात सांगितले. कार्यक्रमाप्रसंगी इ व द जिल्हा परिषद उपविभाग इगतपुरीचे उपअभियंता इंजि. पी. के. शिरसाठ, शाखा अभियंता इंजि. एस. एस. बोराडे, इंजि. एच. सी. शेख, इंजि. एन. आर. पाटील, भोईर, रावले, गायकवाड, बलक, ठाकरे स्थापत्य अभियंता सहाय्यक, भुजबळ, लांडगे भाऊसाहेब व कर्मचारी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!