त्र्यंबक जाधव, इगतपुरीनामा न्यूज, दि. १५
महाराष्ट्र शासन व टाटा ट्रस्टच्या सौजन्याने ई पिक पहाणी ॲपची निर्मिती शेतकऱ्यांना स्वतःआपली पिकपहाणी करता यासाठी करण्यात आलेली आहे. पिकपहाणी शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा विषय असल्याने इगतपुरी तालुक्यातील धामणगाव गंभीरवाडी भागात ॲपचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात आले. इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी तेजस चव्हाण, इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी तालुक्यात नियोजन सुरू आहे.
तलाठी कमरुद्दीन सैय्यद यांनी धामणगाव, गंभीरवाडी, अडसरे खुर्द, तुषार सुर्यवंशी यांनी शेणित परिसरातील साकुर, पिंपळगाव डुकरा, संदीप कडनोर यांनी पिंपळगाव मोर, धामणी, बेलगाव तऱ्हाळे, कवडदरा, घोटी खुर्द, भरवीर, मनोज मोरे यांनी नांदगाव बुद्रुक, लक्ष्मीनगर, कृष्णनगर, सारिका रोकडे यांनी भरविर, पिंपळगाव घाडगा, निनावी ह्या गावांतील शेतकऱ्यांना प्रशिक्षित केले. प्रात्यक्षिक दाखवून शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. यासाठी प्रत्येक गावातील 20 युवा शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. इतर शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्याची जबाबदारी युवा शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.
या ॲपमुळे शेतकरी आता आपली पिकपहाणी प्रत्येक हंगामनिहाय स्वतः करू शकतात. प्रशिक्षणात त्यांना निर्भेळ पिके, जलसिंचन साधने, पडीत क्षेत्र, बांधावरची झाडे कशाप्रकारे आपल्या उताऱ्यावर लावता येईल याची माहिती देण्यात आली. यामुळे नैसर्गिक आपत्तीवेळी अचूक नुकसान भरपाई देणे शक्य होणार आहे. शासनाला पिकांची अचूक आकडेवारी मिळाल्याने त्याप्रमाणे पुढील योजना बाबत नियोजन करण्यास उपयोग होणार आहे.
यावेळी तलाठी कमरुद्दीन सैय्यद, तुषार सुर्यवंशी, सारिका रोकडे, मनोज मोरे, तानाजी बर्डे, सोमनाथ बरतड, शिवाजी गाढवे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गाढवे, माजी उपसभापती पांडुरंग वारूंगसे, पंचायत समिती सदस्या विमल गाढवे, विजयकुमार कर्डक, गंभीरवाडी ग्रामपंचायत सदस्य श्री. भोईर, संदीप जाधव, बाळासाहेब वारुंगसे, सरपंच वैशाली जाधव, संगीता जाधव, सरपंच विनोद आवारी, यादव सहाणे, पोपट जाधव, अनिल जाधव, आबाजी जाधव, विजय जाधव, राजाराम जाधव, सरला घारे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.