इगतपुरीनामा न्यूज, दि. ९
पावसाळी काळात इगतपुरी तालुक्यातील दुर्मिळ रानभाज्या बहुगुणी आहेत. ह्या भाज्या आदिवासी बांधवांचा रोजगार असून यामुळे विषमुक्त आहाराचे महत्व वाढते असे प्रतिपादन इगतपुरीचे सभापती सोमनाथ जोशी यांनी केले. पंचायत समिती इगतपुरी येथे जागतिक आदिवासी दिनानिनिमित्त रानभाजी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी शितलकुमार तंवर म्हणाले की, बदलत्या जीवनशैलीत सेंद्रिय पदार्थांना अनन्यसाधारण महत्व निर्माण झाले आहे. याचे महत्व वाढावे म्हणून कृषी विभागाने रानभाजी महोत्सव आयोजित केला आहे.
माजी आमदार निर्मला गावित, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, उपसभापती विमल तोकडे, पंचायत समिती सदस्य भगवान आडोळे, गटनेते विठ्ठल लंगडे, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी अमित भुसावरे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी संदीप मोगल, नंदकुमार अहिरे, साहेबराव देशमुख आदी उपस्थित होते.
तालुका कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी भास्कर गीते, कृषी पर्यवेक्षक चंद्रशेखर अकोले, रामा दिघे, संजय पाटील, अनिल मुजगुडे, संजीवकुमार चव्हाण, किशोर भरते, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक हितेंद्र मोरे आणि सर्व कृषी सहाय्यक आदींनी महोत्सवासाठी परिश्रम घेतले.