इगतपुरीनामा न्यूज, दि. ९
इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात क्रांती दिन व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रतिमेचे पूजन करण्याात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांनी क्रांती दिनाचे ऐतिहासिक महत्त्व विशद करून स्वातंत्र्य चळवळी बाबत माहिती दिली. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने इतिहासातील प्रसंगांची माहिती दिली.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. यू. एन. सांगळे यांनी केले. कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. एस. बी. फाकटकर, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रा. यू. एन. सांगळे यांनी मानले.