कवी : जी. पी. खैरनार, नाशिक
९४२१५११७३७ / ७०८३२३४०२१
आकाशी चमचमत्या,
चांदण्या दिसे हजार !
एक एक मोजतांना,
बालके होई बेजार !!
चांदोबा उगवण्याचा,
जगा वेगळा प्रहर !
अमावास्या पौर्णिमेला,
कमी जास्त होई कोर !!
चांदोबा असे शीतल,
सूर्य तळपे प्रखर !
तेजोमय सूर्यापुढे,
चांदोमामा माने हार !!
विटी दांडूच्या खेळात,
खेळ खेळी मुले चार !
खेळ रडीचा खेळता,
आई बाप देई मार !!
थंड बर्फ गोळा मिळे,
दोन पैशा गारे गार !
बर्फाचे गोळे खाऊनी,
जीव होई थंडगार !!
खेळ खेळती पारंब्या,
मुलं दिसे शूर वीर !
टांगेमध्ये फेके काठी,
झाडावरी मारे सुर !!
खेळ खेळुनी दमती,
गावातली सारी पोरं !
निसर्गाच्या कवेमध्ये,
आनंद घेई लेकरं !!
यंत्राने हो केला घात,
झाडे केली सारी ठार !
मानवाच्या स्वार्थापोटी,
वने झाली हद्दपार !!
स्वार्थी अरे मानवा,
निसर्गाची कास धर !
मानव सृष्टी जगण्या,
वृक्षांचे जतन कर !!
श्वास कोंडे शहरात,
शेतामध्ये बांध घर !
त्याग करुनी धनाचा,
वनांमध्ये वास कर !!
( कवी जी. पी. खैरनार हे नाशिक जिल्हा परिषद अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक असून नामवंत लरखाक आणि कवी आहेत. )