इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ : तमाम नाभिक समाजासाठी आणि इतरही सर्व समाजासाठी २४ तास कटिबद्ध असणारे लोकाभिमुख व्यक्तिमत्व तथा इगतपुरी तालुक्यातील नामवंत कायदेतज्ज्ञ अॅडवोकेट सुनील कोरडे यांचा आज वाढदिवस. सातत्याने पायाला भिंगरी लावून समाजासाठी जीवाचे रान करणारे हे मार्गदर्शक व्यक्तिमत्व युवकांना नियमित मार्गदर्शन करतात. नाशिक जिल्हा सलून असोसिएशनचे कायदेशीर सल्लागार ह्या महत्वपूर्ण पदाची जबाबदारी पार पाडत असतांना त्यांनी जिल्हाभरात मोठे संघटनात्मक कार्य उभे केलेले आहे. अशा अभ्यासू, जिज्ञासू आणि निर्मळ व्यक्तिमत्वाचा वाढदिवस तारांकित हॉटेलमध्ये करण्याचे त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या कार्यकर्त्यांचे नियोजन होते. मात्र सुनील कोरडे यांनी घरगुती वातावरणात वाढदिवस साजरा करून व्यर्थ होणारा खर्च समाजोपयोगी कार्यात खर्च करण्याचा नवा पायंडा पाडला. यावेळी त्यांनी समाजाला कसे पुढे नेता येईल याबाबत उपस्थितांना सूक्ष्म मार्गदर्शन केले. नामवंत कायदेतज्ज्ञ अॅडवोकेट सुनील कोरडे यांच्या वाढदिवसानिमित्त नाभिक समाज जिल्हा अध्यक्ष पत्रकार एकनाथ शिंदे, उपजिल्हाध्यक्ष निवृत्ती आंबेकर, नाभिक समाज तालुकाध्यक्ष मच्छिन्द्र कोरडे, तालुका सरचिटणीस किरण कडवे, वैभव कोरडे, सुनील गायकर, नितीन जाधव, रामभाऊ कोरडे, शिवाजी आंबेकर, माधव कोरडे, दत्तात्रय कोरडे, कैलास भगत, रोशन डावखर, रोहित डावखर, भास्कर भोईर आदींनी उपस्थित राहून त्यांना उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.