१ हजार जणांच्या मानवी साखळीद्वारे महामार्गावर अंमली पदार्थ विरोधी जनजागृती : वाडीवऱ्हेचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्याकडून औद्योगिक क्षेत्रात प्रभावी जागर 

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक आग्रा महामार्गावरील वाडीवऱ्हे फाटा ते गोंदे फाट्यावर ८०० ते १००० जणांच्या मानवी साखळीद्वारे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. व्यसनाधीन होत चाललेल्या समाजासाठी नशामुक्त राष्ट्र व नशामुक्त देश असा संदेश देण्यासाठी मानवी साखळी परिणामकारक ठरली. बॅनर, फ्लेक्सद्वारे करण्यात आलेल्या ह्या जनजागृती कार्यक्रमामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये जागर झाल्याचे दिसून आले. वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी आज २.३० ते ३.३० वाजेच्या दरम्यान पोलीस ठाणे ह‌द्दीतील औ‌द्योगिक क्षेत्राच्या विविध कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधला. त्यानुसार त्यांच्याकडील अधिकारी, कर्मचारी, कामगार, वाडीवऱ्हे पोलीस ठाणे, जिल्हा वाहतुक शाखा, महामार्ग पोलीस अधिकारी, अंमलदार व होमगार्ड यांच्या सहभागाने १००० जणांची मानवी साखळी यशस्वी करून दाखवली. मानवी साखळी यशस्वी केल्याबद्धल पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी उपस्थित सर्व कंपनी चालक, मालक, कामगार यांचे आभार मानले. यापुढेही असे समाजोपयोगी कार्यक्रम करण्याचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक रामभाऊ होंडे, पोलीस उपनिरीक्षक रामनाथ दिवे तसेच वाडीवऱ्हे पोलीस ठाणे व जिल्हा वाहतुक शाखा, महामार्ग पोलीस मदत केंद्राकडील अंमलदार, होमगार्ड कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात वाडीवऱ्हे पोलीस ठाणे ह‌द्दीतील विविध कंपन्यांचे अधिकारी, कर्मचारी, कामगार यांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतुन आणि अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी हरीष खेडकर यांच्या मार्गदर्शनाने हा उपक्रम संपन्न झाला.

error: Content is protected !!