महाराष्ट्र दिनानिमित्त समाजसेवक ईश्वर मराडे यांनी गरिबांना वाटले २ टन धान्य

इगतपुरीनामा न्यूज – १ मे महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून समाजसेवक ईश्वर (बाळा ) कचरु मराडे यांनी गोरगरीब गरजू नागरिकांना धान्याचे वाटप केले. घोटी येथे धान्य वाटप कार्यक्रम करण्यात आला. एका कुटुंबाला सहा किलो याप्रमाणे एकूण २ टन मोफत धान्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी चंद्रकांत लाखे, देविदास आडोळे, राजु वाघ, दगडू हिलम, संगिता शिणगर, दत्ता राक्षे, आप्पा भोले, भिमराव डोंगरदिवे, तुकाराम भगत, किशोर कडू, राहुल बल्लाया, सखाराम शिंदे व इतर मित्र परिवार यांनी मोलाचे सहकार्य केले. ह्या अनोख्या उपक्रमाचे घोटी शहरात कौतुक करण्यात येत आहे.

error: Content is protected !!