जिल्हा परिषदेच्या विनोबा स्टार टिचर जिल्हास्तरीय पुरस्काराने वंदना सोनार सन्मानित

Advt

इगतपुरीनामा न्यूज – दरेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत उपक्रमशील शिक्षिका वंदना सोनार यांना महाराष्ट्र शासनाच्या आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रमांतर्गत उल्लेखनीय शैक्षणिक योगदानासाठी विनोबा स्टार टिचर जिल्हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल  यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. नुकताच अतिदुर्गम आदिवासीबहुल भागातील दरेवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी वंदना सोनार यांच्या मार्गदर्शनाने जिल्हास्तरीय स्पेलिंग बी स्पर्धेत उत्तम सुयश मिळविले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी त्या सातत्याने शाळास्तरावर नवनवीन नवोपक्रम राबवत असतात.‌ ह्या शैक्षणिक वर्षात त्यांनी सलग आठ महिने दरेवाडी शाळेला स्टार टिचर पुरस्कार व तीन वेळा पोस्ट ऑफ द मंथ किताब मिळवून दिला. या उत्कृष्ट यशाबद्दल नाशिक जिल्हा टीम विनोबाकडून दरेवाडी शाळेचे विशेष अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव, उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, कोटक महिंद्रा उद्योग समूहाचे समन्वयक प्रेमकुमार, विनोबा भावे कार्यक्रमाचे विश्वजित पवार, राम काळे, कृष्णा घायाळ, राकेश महाजन व नाशिक जिल्हा विनोबा टीमचे सदस्य उपस्थित होते. या यशाबद्दल दरेवाडी शाळेचे इगतपुरीचे गटशिक्षणाधिकारी, सर्व विस्ताराधिकारी, सर्व केंद्रप्रमुख आणि शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!