प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. १६
मुकणे येथील महर्षी पुंजाबाबा गोवर्धने विद्यालय, ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद शाळा या तीनही ठिकाणी स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.
एमपीजी विद्यालय : सरपंच हिरामण राव, बाजार समिती संचालक विष्णु राव, व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक राव व मान्यवरांच्या हस्ते ध्वजपुजन करण्यात आले. शालेय स्कुल कमिटी चेअरमन तथा घोटी बाजार समितीचे माजी सभापती गणपत पाटील राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
मुकणे ग्रामपंचायत कार्यालय : येथे ग्रामपंचायत सदस्य सखुबाई हिलम व उपसरपंच भास्कर राव सदस्य तथा मान्यवरांच्या हस्ते ध्वजपुजन करून ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच हिरामण विष्णु राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
जिल्हा परिषद शाळा : येथे शालेय व्यवस्थापन समिती सदस्य देविदास राव यांच्या हस्ते ध्वजपुजन तर अध्यक्ष नारायण बोराडे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ग्रामपंचायतीतर्फे इयत्ता १० वीत प्रथम आलेले वेल्हाळ साक्षी सखाराम – प्रथम, प्रिया संतोष उबाळे – द्वितीय, पूजा बाळु खांदवे – तृतीय, अक्षदा नारायण गोवर्धने – चतुर्थ व तनुजा संजय राव पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
गावातील भजनी मंडळ व गावातील जेष्ठ नागरिकांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच हिरामण विष्णु राव, उपसरपंच भास्कर राव, बाजार समितीचे माजी सभापती गणपत पाटील राव, माजी संचालक विष्णु पाटील राव, सोसायटी चेअरमन जगन पाटील राव, सोसायटी संचालक गणेश राव, मोहन बोराडे, चंद्रभान बोराडे, पोपट राव, काळु आवारी, निवृत्ती आवारी, सुरेश आवारी, भास्कर आवारी, बाजीराव आवारी, मुरलीधर बोराडे, अनिल राव, ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ राव, अशोक राव, मोहन बोराडे, पोपट वेल्हाळ, ग्रामसेवक उमेश खैरनार, मुख्याध्यापिका कल्पना महिरे, वंदना पाटील, सरला देवरे, निता गोसावी, प्रमिला जगताप, प्रतिभा पाटील, प्रशांत चव्हाण, नारायण बोराडे, मुख्याध्यापक के. ए. जाधव, उमेश महाजन, ओमानंद घारे, विनायक लाड, सुनील वाणी, शिक्षक पांडुरंग देवरे, विजया पाटील, भारती शिंदे, राजीव शेवाळे, दगडू तेलोरे, रमेश खैरनार, सुरेखा चव्हाण, प्रमिला निर्मळ आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.