
इगतपुरीनामा न्यूज – राष्ट्र उभारणीत शिक्षकांचे मोलाचे योगदान असल्याने रोटरी क्लब ऑफ नाशिक ग्रेप सिटीकडून गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांना नेशन बिल्डर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी हा कार्यक्रम नाशिक येथे मोठ्या दिमाखात पार पडला. नेशन बिल्डर पुरस्कार वितरण रोटरी क्लब ऑफ नाशिक ग्रेप सिटीच्या अध्यक्ष रेणू पनीकर यांच्या हस्ते आणि माजी अध्यक्ष जयंत खैरनार, डॉ. जयेश ढाके, माजी अध्यक्ष अलका सिंग, सदस्य अमित घरटे, पद्मिनी सुजाथन, मुकुल चतुर्वेदी, हरिष सोनवणे, शेफाली अग्रवाल यांच्या उपस्थितीत करण्यात आले. निवृत्त केंद्रप्रमुख श्रीराम आहेर यांचा सत्कार माजी अध्यक्ष जयंत खैरनार यांनी केला. जिल्ह्यातील ११ गुणवंत शिक्षकांना अतिशय सन्मानपूर्वक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यात मीना ठोके भरवज ता. इगतपुरी, माधुरी जाधव जामुंडे ता. इगतपुरी, गीतांजली परदेशी बानेवाडी ता. इगतपुरी, उमेश राठोड नांदगाव सदो ता. इगतपुरी, कविता जयदीप पाटील, लीलाबाई बबन चौरे, प्रकाश पाटील, वंदना धर्मा देवरे, अश्विनी सुभाष पाटील, वैशाली वाघ, शीतल आहेर यांना पुरस्काराने गौरवण्यात आले. निवृत्त केंद्रप्रमुख श्रीराम आहेर यांनी अतिशय पारदर्शी आणि वस्तूनिष्ठ पद्धतीने गुणवंत शिक्षकांचे मूल्यमापन केले. रोटरी क्लबचे अध्यक्ष रेणू पनीकर यांनी सर्व शिक्षकांच्या अद्वितीय आणि अनुपम कार्याचा गौरव करून सर्व गुणवंतांचे अभिनंदन केले. पुरस्कार्थी प्रकाश पाटील, वैशाली वाघ, कविता पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन रागिणी भवर यांनी केले.