इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथील ज्ञानदा माध्यमिक विद्यालयाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ ह्या अनोख्या अभियानात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. ३ लाख रुपये, सन्मानपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके, माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप गुळवे यांच्या हस्ते ज्ञानदा विद्यालयाला पुरस्कार वितरण करण्यात आले. आमदार हिरामण खोसकर म्हणाले की, तालुक्यातील सर्व शाळांमध्ये १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत हे अभियान राबविण्यात आले. या अभियानास विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच माजी विद्यार्थी, पालक व शिक्षकप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या अभियानात यशस्वी ठरलेल्या शाळांना रोख रकमेच्या स्वरूपात पारितोषिके देण्यात येतात. या रकमेचा विनियोग शाळांच्या गरजेनुसार करण्याची मुभा देखील शाळा व्यवस्थापनास देण्यात आली आहे. त्यामुळे या शाळांना तातडीच्या गरजा भागविण्याकरीता निधी उपलब्ध झाला आहे. विविध प्रकारचे चाकोरीबाहेरील स्पर्धात्मकवृत्ती निर्माण होऊन त्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना मिळावी व त्यांना खऱ्या अर्थाने बाह्य जगाची ओळख व्हावी हा या अभियानाचा मूळ हेतू असून तो साध्य करता आला आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांनी दिली. यावेळी सरपंच शैला आहेर, काँग्रेस नेते पांडुरंग शिंदे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक निलेश बुवा पदाधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक उपस्थित होते.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group