इगतपुरीनामा न्यूज – ‘अज्ञानातून तरुन जायचं असेल तर साधूची संगतीच उपयुक्त ठरु शकते. साधु-संत हे आपल्याला अज्ञानाच्या निद्रेतून जागे करणार्या संतांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, असं सांगताना तुकाराम महाराज काय सांगू आता संतांचे उपकार । मन निरंतर जागविती ॥ असे आपल्याला सांगतात. अत्यंत प्रेमळ संत आपल्याला क्षणोक्षणी सांभाळत, सावरत असतात. त्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. त्यांच्याप्रति कृतज्ञ भाव ठेवून राहणे केव्हाही हिताचे ठरते असे मार्गदर्शन जनम प्रवचनकार बिपिन नेवासकर यांनी आपल्या सुमधुर प्रवचनातून केले. इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे येथे जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज यांचा सत्संग मोठ्या अध्यात्मिक वातावरणात संपन्न झाला. यावेळी बिपीन नेवासकर यांनी आजची पिढी व्यसनाधीन झाली असून भावी पिढी सुसंस्कृत आणि व्यसनमुक्त करण्यासाठी संतांनी सांगितलेल्या मार्गावर जगा. मुलांना सत्संगात आणा. तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. स्वप्नात सुद्धा कोणाचे वाईट चिंतू नका असा संदेश उपस्थित भाविकांना सांगत जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या कार्याची महती सांगितली. सत्संगानिमित्त सकाळी ८ वाजता गावातुन पालखीची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीतील विविध देखाव्यांनी भाविकांचे मन वेधून घेतले. भाविकांनी मंत्रमुग्ध होऊन या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. १५०० भाविकांनी या कार्यक्रमाद्वारे लाभ घेतला. महाप्रसादानंतर कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाप्रमुख संदीप खंडारे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख संदीप देवरे, जिल्हा कर्नल लक्ष्मीकांत आडोळे, महिला जिल्हाध्यक्ष अर्चना गवळी, इगतपुरी तालुका ऍम्ब्युलन्स निरीक्षक राजेंद्र उदावंत, तालुकाध्यक्ष देवराम राक्षे, महिला अध्यक्ष मनीषा गतीर, युवा प्रमुख तुषार घोरपडे, केशव तोकडे, भगवान घोरपडे, ज्ञानेश्वर पवार, गोकुळ आगीवले, दत्तात्रय आडोळे, नागेश भुसे, संतोष महाराज थोरात, सर्व तालुका कमिटी, सत्संग कमिटी हजर होते.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group