रिलायन्स फाउंडेशनच्या साहाय्याने इगतपुरी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी अनुभवला आयपीएलचा थरार : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर बसून लुटला मनमुराद आनंद

इगतपुरीनामा न्यूज : आयपीएल म्हणजे क्रिकेट विश्वातील मोठा महोत्सव असल्याची क्रिकेटप्रेमी रसिकांची भावना आहे. शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा आयपीएलचे मोठे आकर्षण आहे. ऑनलाईन माध्यमातून क्रिकेट पाहून आपली हौस भागवणारे विद्यार्थी आहेत. स्टेडियममध्ये बसून मॅच बघण्याची मजा काही वेगळीच असते. म्हणूनचज आयपीएलचा थरार आपल्याला थेट स्टेडियमवर बसून पाहायला मिळावा असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र आदिवासी अतिदुर्गम भागात हे स्वप्न कधीही पूर्ण होईल याची शाश्वती नसते. स्टेडियमवर बसून आयपीएल पाहण्याची रिलायन्स फाउंडेशनकडून इगतपुरी तालुक्याच्या ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना आज मिळाली. १२ बसमधून मुंबईला जाऊन विद्यार्थ्यांनी आज क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटला. सकाळी नास्ता, दुपारी जेवण, थंडपेय, क्रिकेटचे टी शर्ट विद्यार्थ्यांना देण्यात आले. कुरुंगवाडी, मोडाळे, शिरसाठे, धामडकीवाडी, भगतवाडी, वाघ्याचीवाडी, टाकेघोटी, इगतपुरी शहरातील २ अशा विविध शाळेतील विद्यार्थ्यांना रिलायन्स फाउंडेशनमार्फत क्रिकेटविश्वाचा खराखुरा आनंद मिळाला. सर्वाधिक लोकप्रिय ठरत असलेल्या आणि शालेय विद्यार्थी युवा वर्गाचे पसंती ठरत असेल इंडियन प्रीमियर लीगचे सामने प्रत्यक्ष बघण्याची संधी ह्या विद्यार्थ्यांना मिळाली. याबद्दल पालकांनी रिलायन्स फाउंडेशनचे आभार मानले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!