इगतपुरीनामा न्यूज – सध्या शालेय, विद्यालयीन तरुण-तरुणी यांचा मोबाईलचा वाढलेला वापर अत्यंत घातक आहे. याचे विपरीत परिणाम दिसून येत आहे. पोलीस ठाण्यात रोज येणाऱ्या तक्रारी पाहता युवा पिढीने सोशल मीडियाच्या नादात भरकटून न जाता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. सशक्त पिढी निर्माण करण्यासाठी शालेय जीवनाचा फायदा घ्यावा असे आवाहन इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांनी केले. इगतपुरी येथे प्रभू नयन फाउंडेशन, मुंबई व श्री साई सहाय्य समितीच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. महिलांच्या सबलीकरणासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असले तरी महिलांनीही समाजात आपले स्थान निर्माण करण्यासाठी कष्ट घेण्याची तयारी ठेवावी असे आवाहन दीपा मवाणी यांनी केले. यावेळी विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या २७ जणांना मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
यावेळी इगतपुरीचे तहसीलदार अभिजीत बारवकर, प्रभुनयन फाउंडेशनचे आनंद मवानी, साईभक्त प्रसाद अय्यर, उद्योजक शंकर लोचानी, रुपेश जाधव उपस्थित होते. याप्रसंगी श्री साई समिती मुंबई महिला अध्यक्षा सान्वी कोकाटे, सरला चांदवडकर, डॉ. सुनील बोधमवाड, माधुरी पाटील, किरण फलटणकर, मनोहर शिंगाडे, बाळासाहेब धुमाळ, भगवान मधे, विजय कातोरे, अजित लुणावात, विजय महाराज चव्हाण, पत्रकार पोपट गवांदे, राजेंद्र नेटावटे, शैलेश पुरोहित, वाल्मिक गवांदे, सुमित बोधक, संदीप कोतकर, गणेश घाटकर, निखिल कर्पे, रोहिदास शिर्के, हितेश सावंत यांच्यासह २७ जणांना गौरवण्यात आले. कार्यक्रमासाठी श्री साई सहाय्य समितीचे संस्थापक अध्यक्ष राजू देवळेकर, नितीन चांदवडकर, अजित पारख, प्रवीण भटाटे, समाधान खातळे, रत्नदीप बिर्जे, मयूर मिठी, निखिल कर्पे, अक्षय कर्पे, योगेश चोपडा, उमेश कस्तुरे, लक्ष्मण सोनवणे, शरद धोंगडे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अजित लूनावत यांनी केले.