आयडियल तायक्वांदो अकॅडमी इगतपुरीचे काम अतिशय प्रेरणादायी – गोरख बोडके, ज्ञानेश्वर लहाने : तायक्वांदो अँड फिटनेस असोसिएशन ऑफ इगतपुरी तालुका अंतर्गत तायक्वांदो बेल्ट प्रमोशन २०२४ संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – आयडियल तायक्वांदो अकॅडमी इगतपुरीचे काम अतिशय प्रेरणादायी असून यांच्यामार्फत उत्कृष्ठ खेळाडू उदयाला येत आहेत. ह्या सर्वांच्या सामूहिक शक्तीने इगतपुरी तालुक्यातील खेळाडू आपल्या कौशल्यातून भरीव यश मिळवतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके, घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा तायक्वांदो अँड फिटनेस असोसिएशन ऑफ इगतपुरी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर दादा लहाने यांनी व्यक्त केला. आयडियल तायक्वांदो अकॅडमी इगतपुरी यांनी तायक्वांदो अँड फिटनेस असोसिएशन ऑफ इगतपुरी तालुका अंतर्गत तायक्वांदो बेल्ट प्रमोशन २०२४ चे आयोजन केले होते. इगतपुरी येथील क्रीडा संकुल गोळीबार मैदान येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमांतर्गत तायक्वांदो मध्ये कलर बेल्ट मिळालेल्या खेळाडूंना गोरख बोडके, ज्ञानेश्वर दादा लहाने यांच्या हस्ते बेल्ट प्रमोशन प्रमाणपत्र व कलर बेल्ट देण्यात आले. मान्यवरांनी यावेळी सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आयोजन तायक्वांदो अँड फिटनेस असोसिएशन ऑफ इगतपुरी तालुका सचिव विशाल वि. जगताप, खजिनदार खंडू भगीरथ लहाने, उपाध्यक्ष दिनेश नायर यांनी केले होते. ॲड. आनंद चांडक, सचिन जगताप, इमरान शेख, सुरेंद्र गायकवाड, महेश हरिभक्त, मीना जगताप यांनी सदस्यत्व म्हणून काम पाहिले. क्रीडा संकुलाचा हॉल कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्यासाठी राहुल पंडित यांनी विशेष परिश्रम घेतले. संध्या भटाटे, नितीन शिंदे, विकास लहाने, माधव तोकडे, सुबोध जगताप, कार्तिक जगताप, प्रफुल्ल आढांगळे, यश आढांगळे, सीनियर व ज्युनिअर खेळाडू यांनी कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले.

Similar Posts

error: Content is protected !!