लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – बेलगाव कुऱ्हेचे शेतकरी राजू बोराडे यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत दहा गुंठ्यात गुलाब शेतीचा प्रयोग यशस्वी केली आहे. दिल्लीत फुल मार्केटमध्ये त्यांच्या गुलाबाला चांगला भाव मिळत आहे. यामधून त्यांना एका वर्षात साडे तीन लाख उत्पन्न मिळाले. ठिबक सिंचन सुविधा असलेले पॉलीहाऊस उभारून त्यांनी हा प्रयोग केला आहे. या शेतीतून चाळीस दिवसानंतर तोडणीला फुले येतात. या पिकाची एकदाच लागवड केली जाते. त्यामुळे पुन्हा पुन्हा लागवड करण्याचा खर्च येत नाही. पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथून गुलाबाची रोपे आणली जातात. वेळापत्रकानुसार 45 दिवसांनी गुलाबाला फुले येतात. फुलांचे व्यापारी नियोजन पाठवतात त्याप्रमाणे मुहूर्त साधून विक्री होते. लग्न सराई असो वा कोणतेही सण उत्सव यामध्ये गुलाबाला खूप मागणी असते. त्यामुळे ही शेती फायदेशीर ठरते आहे. या शेतीत 40 टक्के खर्च नफा 60 टक्के होतो. त्यांचे चुलत भाऊ संजय बोराडे यांचे त्यांना मार्गदर्शन मिळाले. कै. लक्ष्मण दादा बोराडे यांच्या आशीर्वादाने आई गंगुबाई यांची प्रेरणा घेऊन शेती करीत असल्याचे बोराडे यांनी सांगितले. त्यांची पत्नी योगिता त्यांना शेतीत मदत करते. शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी या ठिकाणी सहलीत माहिती दिली जाते. नाशिक जिल्ह्यातील निफाड, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी गुलाब शेतीला भेटी दिल्या आहेत.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group