इगतपुरीनामा न्यूज, दि. ७
नाशिक येथील युनायटेड व्ही स्टँड या संस्थेने आपल्या संस्थेतील सदस्यांना सैनिक क्षेत्राबद्दल माहिती मिळावी आणि आपल्या परिवारापासुन दूर राहून सदैव देश सेवेत कटिबध्द असलेल्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी करता यावी, या दुहेरी उद्देशाने काल युनायटेड व्ही संस्थेने आर्टिलरी सेंटरला भेट दिली.
सैनिकांकडून आणि देशभक्तीतुन प्रेरणा घेऊन जास्तीत जास्त लोकांनी देशसेवेत रूजू व्हावे. हा उद्देश ठेऊन संस्था गेल्या ७ वर्षापासुन सैनिक आणि त्यांच्याशी निगडीत विविध उपक्रम राबवत आहे. मागच्या दिवाळी दरम्यान संस्थेने कोलाबा स्थित युनिटला भेट देत तेथील सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. विविध प्रकारचा दिवाळी फराळ वाटप करत संस्थेने सैनिकांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला. यंदा ही तीच संकल्पना घेऊन संस्थेने आर्टिलरी सेंटर मधील सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला.
संस्थेतील सदस्यांनी ४ दिवस सतत फराळ बनवण्यापासुन बॉक्स भरण्यापर्यंतची संपूर्ण जबाबदारी मोठ्या उत्साहाने पूर्ण केली. आपल्या संरक्षणासाठी दिवाळी सारख्या सणांमध्ये स्वतःच्या घरापासुन दूर राहत देशसेवेत असलेल्या सैनिकांसाठी दिवाळी परिपूर्ण करण्याचा हा प्रयत्न असून, हा उपक्रम राबवत असताना जबाबदारीच भान आणि आनंदाची, अभिमानाची भावना निर्माण होत असल्याचं संस्थेतील सदस्यांनी सांगितले. सदस्यांनी आर्टिलरी सेंटर मधील ३ हजार सैनिकांना दिवाळी फराळ वाटप केले, या दरम्यान ब्रिगेडियर व सेंटर कमांनडंट ए. रागेश यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नल एन. बी. सिंग, मेजर विजेंद्र मोहिते व शेकडो जवान उपस्थित होते.
या भेटी दरम्यान संस्थेने आर्टिलरी सेंटर मधील म्युझिअमला भेट दिली व तेथे असलेले शस्त्र, युद्ध झालेल्या भागातील बनवण्यात आलेल्या आकृती व इतर अनेक घटनांची माहिती घेतली. ही माहिती ऐकत असताना आपल्या भारतीय सैन्याबद्दल विशेष आदर, प्रेम आणि अभिमानाची भावना निर्माण होत असल्याचं संस्थेतील सदस्यांनी यावेळी सांगितले. संस्थेचे अध्यक्ष सागर मटाले, शिवम पाटील, निलेश पवार, ओम काठे, हिमांशू सूर्यवंशी, महेंद्र पोरजे, अनिमेश दास, नयन हिरे, पियुष कर्णावट, नीरज चांडक, किरण जावळे, उमाकांत चव्हाण, राहुल पवार, अमोल पवार, योगेश गवळी, सागर राठोड, सुधीर धोंगडे, स्मृती आवारे, पूजा गोडसे, स्मिता वाघ, रिशिका ललवाणी, श्वेता मुंढे आदी उपस्थित होते.