इगतपुरीनामा न्यूज – लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ आल्या असुन यासाठी प्रत्येक गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. युवकांनी गावनिहाय कमिटी तयार कराव्यात, विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गावागावात जाऊन पक्ष वाढवावा असे आवाहन इगतपुरीचे माजी आमदार शिवराम झोले यांनी केले. खंबाळे ता. इगतपुरी येथे अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत माजी आमदार शिवराम झोले बोलत होते. जिल्हाध्यक्ष विष्णु म्हैसधुणे यांनी आढावा बैठकीत बोलतांना सांगितले की ज्या नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र दिले आहे त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी जोमाने कामाला लागावे. आगामी खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी निवडून आले पाहिजे. यासाठी मतभेद बाजुला ठेवुन प्रत्येक कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागले पाहिजे. नाशिक लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावी. या मतदारसंघातून जिल्हाध्यक्ष विष्णु म्हैसधुणे यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांनी या बैठकीत केली. या बैठकीत युवक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ, तालुकाध्यक्ष पांडुरंग वारुंगसे, माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, आदींनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीला जेष्ठ नेते रतन जाधव, जिल्हा नियोजन समितीचे केरु खतेले, नामदेव वाकचौरे, अजय खांडबहाले, नारायण वळकंदे, विष्णु राव, मदन कडु, विष्णु चव्हाण, पोपट भागडे, अनिल पढेर, वसिम सय्यद, राहुल सहाणे, हरिष चव्हाण, ज्ञानेश्वर शिरसाठ, पांडुरंग खातळे, भाऊसाहेब म्हस्के, अरुण पोरजे, अशोक गभाले, बाळासाहेब झोले, सदाशिव काळे, दूंदा जोशी, ज्ञानेश्वर पासलकर, किरण मुसळे, वसंत भोसले, जिल्हा उपाध्यक्ष महेश शिरोळे, रतन बांबळे, निवृत्ती भगत, सागर वाजे, अशोक गभाले, विष्णू राव, दिनेश शिंदे, निलेश जगताप, उमेश बऱ्हे उपस्थित होते.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group