इगतपुरीनामा न्यूज – मानवी हक्क दिनाच्या पार्श्वभूमीवर एल्गार कष्टकरी संघटना महाराष्ट्र या आदिवासी संघटनेचा राज्यव्यापी मेळावा इगतपुरी तालुक्यातील वैतरणा येथे घेण्यात आला. या मेळाव्यात “आपल्या गावात आपले सरकार” अशी घोषणा करून संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. यापुढे एकही आदिवासी कुटुंब जातीचा दाखला, रेशन कार्ड विना राहणार नाही असा निर्धार करण्यात आला. प्रास्ताविकात संघटनेचे संस्थापक भगवान मधे यांनी गतवर्षात झालेल्या कामकाजाचा लेखाजोखा सादर करीत आगामी काळात आदिवासी बांधवांना त्यांचे हक्क व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संघटनेची संघटनेची वाटचाल असेल असा मानस व्यक्त केला. प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांनी आदिवासी बांधवानी मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य देऊन पुढे आपली प्रगती साधावी. युवकांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन रोजगार, स्वयंरोजगार निर्माण करावा. आदिवासी बांधवांच्या प्रगतीसाठी व न्याय हक्कासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही दिली.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके, संघटनेचे संस्थापक भगवान मधे, संतोष ठोंबरे, भगीरथ फसाळे, मोहन शेवरे, वसंत इराते यांनी मनोगत व्यक्त करून समाजाच्या सर्वांगीण हितासाठी संघटनेला पाठबळ देण्याचे आवाहन केले. या मेळाव्यास नागोसलीचे उपसरपंच अशोक शिंदे, सुरेखा मधे, धारगावचे उपसरपंच तानाजी खातळे,, वसंत इरते, तानाजी कुंदे, अशोक शिंदे, शरद दिवे, भीमा गुंबाडे, संतू पादीर, शांताराम पादीर, गणपत गावंडे, दीपक पवार, मंगलताई खडके, काळू भस्मे, काळू निरगुडे, बाळू उघडे, राजू मेंगाळ, चेतन बेंडकोळी विठ्ठल ढोले, विठ्ठल शिद, तुषार देहाडे, गणेश दोंदे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.मेळाव्यात आदिवासींच्या वनजमिनी बाबत तसेच वैतरणा धरणाच्या संपादित अतिरिक्त जमिनी मूळ शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी लवकरच लढा उभारला जाईल, प्रसंगी मुंबई महानगरला जाणारा पाणीपुरवठा बंद करू असा इशारा भगवान मधे यांनी दिला. अनेक आदिवासी कुटूंब घरकुलांपासून वंचित असल्याने वंचित कुटुंबांना ते मिळवून देण्यासाठीही लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला.