इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील अविनाश कैलास गतीर ह्या युवकाचा २ डिसेंबरला अपघाती मृत्यू झाला होता. त्या अपघातात मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना १० लाख रुपये तात्काळ मदत मिळावी या कारणास्तव मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला होता. या प्रकरणी घोटी पोलिसांनी २२ ज्ञात व इतर ४० ते ५० अज्ञात इसम यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. जिल्हाधिकारी नाशिक यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघण करुन गैरकायद्याची मंडळी जमा केली. महामार्ग व टोल प्रशासनाचे अधिकारी यांना घटनेच्या ठिकाणी बोलावले. त्यांच्याकडुन अपघातात मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना १० लाख रुपये तात्काळ मदत मिळावी या कारणास्तव राष्ट्रीय महामार्ग अडवला. कर्तव्यावरील पोलीसांशी धक्काबुक्की, झटापट व शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा आणला म्हणुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय दंडविधान संहितेचे कलम ३५३, ३४१, १४३, १४७, १४९, ५०४, मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ चा १, ३ चे उल्लंघन १३५ प्रमाणे संशयित आरोपी निलेश उल्हास गतीर, मच्छिन्द्र चंदर गतीर, कृष्णा अंबादास गतीर, आकाश म्हात्रे, देविदास सोपान गतीर, गुरुनाथ कैलास गतीर, महेश सुकदेव गतीर, संजय सुकदेव गतीर, काळू कुंडलिक गतीर, ज्ञानेश्वर सीताराम घोटकर, गोटीराम शिवराम गतीर, प्रवीण रावजी गतीर, ऋषिकेश रामलाल गतीर, ओमकार संतू गतीर, गोट्या मुरलीधर तांगडे, छोटू लहाने, बाळा सोपान गतीर, कृष्णा बन्सी गतीर, हिरामण महादू गतीर, विनायक गतीर सर्व राहणार मुंढेगाव, रुपेश नाठे रा. गोंदे दुमाला, लक्ष्मण उर्फ लकी जाधव रा. नाशिक व इतर ४० ते ५० इसम ( नाव गाव माहित नाही. ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी आपल्या पोलीस पथकासह तपास सुरु केला आहे.