
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील नागोसली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक आज अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. विशेष म्हणजे तरुण चेहरा या ग्रामपंचायतीला लाभल्याने तालुक्याउन कौतुक होत आहे. आज झालेल्या विशेष बैठकीत उपसरपंच पदासाठी अशोक दत्तू शिंदे यांचा एकमेव अर्ज विहित वेळेत आला. त्यामुळे अध्यासी अधिकारी लोकनियुक्त सरपंच काशिनाथ होले यांनी उपसरपंच पदी अशोक दत्तू शिंदे यांची निवड झाल्याचे घोषित केले. या बैठकीवेळी ग्रामपंचायत सभागृहात सुरेश आनंदा धापटे, सुमनबाई लक्ष्मण मुतडक, कणिता संजय होले हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. या निवडीचे समाजसेवक प्रमोद मोजाड, बाजीराव जाधव, गणपत शेलार, माजी ग्रामपंचायत सदस्य रोहिणी शेलार, दत्तू पाटील शिंदे, श्याम शिंदे, गजीराम जोंधळे, देवराम शिंदे, सुखा होले, तानाजी शेलार, ढवळू होले, ज्ञानेश्वर जोंधळे, ज्ञानेश्वर शेलार, शामभाऊ शिंदे, लक्ष्मण शिंदे, निवृत्ती शिंदे, कैलास ताठे, बाळू ताठे, गजीराम जोंधळे, पंढरी होले, आनंदा धापटे, राजू खामकर, चंदर गिरे, मनाजी खोडके, बाळू डोळस, आकाश गरुड, चिवा सप्रे, वसंत बोराडे आदींनी या निवडीचे स्वागत करून अभिनंदन केले. लोकांनी भरभरून आशीर्वाद दिल्यामुळे उपसरपंच होता आले. या पदाच्या माध्यमातून ग्रामविकास साधण्यासाठी निरंतर तत्पर राहील. ग्रामस्थांसाठी जीवाचे रान करून चांगली कामगिरी करील असे प्रतिपादन नूतन उपसरपंच अशोक शिंदे यांनी केले.