जबरी चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी इगतपुरी पोलिसांकडून गजाआड

इगतपुरीनामा न्यूज – काही दिवसांपूर्वी इगतपुरी येथील इंडीयन ऑईल पेट्रोल पंपा जवळ राजेशाही हॉटेल समोर रस्त्याच्या कडेला रामदास आनंदा आडोळे हे त्याच्या मोबाईल वरून विठ्ठल आडोळे ह्या मित्राशी बोलत होते. त्यावेळी दोन अज्ञात आरोपींनी मोटारसायकलवरून पाठीमागुन संगनमताने त्यांच्या हातातुन बळजबरीने मोबाईल हिसकावुन ओढून जबरी चोरी केली होती. रामदास आडोळे यांच्या फिर्यादीवरून इगतपुरी पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून कसून तपास सुरु केला होता. ह्या गुन्ह्यात सीसीटीव्हीच्या आधारे संशयित आरोपी नामे पुरुषोत्तम संजय गिरी उर्फ गाग्या, वय २१ रा. नांदगाव सदो याला बुधवारी रात्री इगतपुरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या सह अन्य संशयित आरोपीचे नाव समजले आहे अशी माहिती इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी दिली. संबंधित संशयित आरोपीवर यापूर्वी इगतपुरी पोलीस ठाणे गु. र. 9/2022 कलम 302, 34 IPC, गु. र. 98/2023 कलम 392, 34 IPC, गु. र. 66/2023 कलम 385, 34 IPC, वाडीवऱ्हे पोलीस ठाणे गु. र. 166/2023 कलम 353, 307, 34 IPC असे गुन्हे दाखल आहेत. इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कांचन भोजने आणि पोलीस पथक पुढील तपास करीत आहे.

Similar Posts

error: Content is protected !!