इगतपुरीनामा न्यूज – आज सायंकाळच्या सुमारास नाशिक मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात बससह अन्य तीन गाड्यांच्या अपघातात ४ ते ५ जण जखमी झाले आहेत. कसारा घाटात एका काळी पिवळी इको गाडीला ट्रकने धडक देऊन अपघात झाला होता. अपघातातील प्रवासी उतरून सुरक्षित ठिकाणी पोहचत असतानाच ट्रकला मागून शिवशाही बसने ठोकले. यामुळे बसच्या मागे असलेला ट्रेलर ट्रक बसवर जाऊन आदळला. या विचित्र अपघातात इको सह बसचे मोठे नुकसान झाले. बसला पुढून व मागून धडक बसल्याने शिवशाई बसने पेट घेतला होता. परंतु प्रसंगावधान राखीत बस मधील सर्व प्रवासी बसमधून खाली उतरल्याने ते थोडक्यात बचावले. या अपघाताची माहिती मिळताच काही मिनिटातच आपत्ती व्यवस्थापन् टीमचे सदस्य शाम धुमाळ, दत्ता वाताडे, शरद काळे, देवा वाघ यांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्य केले. बसचालकाच्या मदतीने आग तात्काळ विझवण्यात यश आले. दोन प्रवाशांना गंभीर दुखपत झाल्याने त्यांना इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्य, महामार्ग सुरक्षा पोलीस, कसारा पोलीस घटनास्थळी मदत केली. या विचित्र अपघातामुळे कसारा घाटात वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. मात्र पोलीसांनी अपघातग्रस्त वाहने तातडीने बाजुला केल्याने वाहतुक सुरळीत झाली. दुसऱ्या एका अपघातात मुंबई नाशिक महामार्गावर रायगड नगर जवळ उभ्या असलेल्या ओमनीला पाठीमागून येणाऱ्या कारचे टायर फुटल्याने कारने जोरदार धडक दिली. त्याचवेळेस पाठीमागून येणाऱ्या ट्रक चालकाने पुढे घडलेला अपघात पाहत ट्रक कंट्रोल करत असताना गाय आडवी आल्याने गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक विरुद्ध लेनवर जाऊन महामार्गावर पलटी झाला. या विचित्र अपघातात चार जण जखमी झाले असून त्यांना जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेने तात्काळ घटनास्थळी दाखल होत वाहतूक पोलिसांच्या मदतीने पुढील उपचारासाठी नाशिक येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group