
इगतपुरीनामा न्युज – विविध शासकीय योजना प्रशिक्षणाद्वारे पोहचविण्याचे कार्य अमळनेर राष्ट्रविकास अँग्रो एज्युकेशनचे मुख्य प्रशिक्षक तथा बाळकृष्ण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अध्यक्ष कैलास चौधरी करतात. त्यांच्या कार्याची दखल रंग साहित्य कला प्रेरणेने घेतली आहे. त्यांना द ग्रेट इंडियन आयकॉन अवॉर्डची घोषणा शामरंजन फाउंडेशनने केली. कला व संस्कृती विभाग गोवा, स्मित हरी प्रॉडक्शन, शामरंजन फाउंडेशनतर्फे मुंबईत रविवारी १ ऑक्टोबरला पुरस्कार वितरण होईल. अभिनेते सुनील गोडबोले, अभिनेत्री मेघा घाडगे, हास्य जत्रा कलाकार प्रभाकर मोरे यांच्या हस्ते त्यांना अवॉर्ड देण्यात येईल. आदर्श गाव, आमची शाळा प्रकल्प, जल स्वराज्य प्रकल्प, वन हक्क प्रशिक्षण, बाल हक्क व संरक्षण,अन्न सुरक्षा, पेसा, महिला बाल कल्याण, माहिती अधिकार, १५ वा वित्त आयोग, महिला गटांना प्रशिक्षण, सरपंच, ग्रा. पं. सदस्य प्रशिक्षण, वन व्यवस्थापन, पाणी अडवा पाणी जिरवा, वन धन योजना, जलजीवन मिशन हे प्रशिक्षण श्री. चौधरी देतात.