इगतपुरीनामा न्यूज – कावनई विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हॉइस चेअरमन पदाची निवडणूक अविरोध पार पडली. चेअरमनपदासाठी खंडेराव पाटील यांचा एकमेव अर्ज आला. तर व्हाईस चेअरमन पदासाठी राजाराम शेलार यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना सैंदाणे यांनी ही निवड बिनविरोध घोषित केली. खंडेराव पाटील यांची चेरमनपदी निवड झाली तर व्हाईस चेरमनपदी राजाराम शेलार यांची निवड झाली आहे. काँग्रेस जनेते ॲड. संदीप गुळवे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, उपसभापती शिवाजी शिरसाठ व बाजार समिती संचालक सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली कावनई विविध कार्यकारी सोसायटीची निवड अविरोध झाली आहे. सोसायटीचे संचालक शिवाजी शिरसाठ, माजी चेअरमन शरद शिरसाठ, माजी व्हॉइस चेअरमन जगन पाटील, सुनील शिरसाठ, रामभाऊ पाटील, संदीप शिरसाठ, लालचंद धुमाळ, नंदू पाडेकर, मुक्ताबाई शिरसाठ, कलाबाई शिरसाठ, संतोष दोंदे हे संचालक यावेळी सभागृहात उपस्थित होते. निवडीवेळी सहायक म्हणून सचिव आर. के. राऊत यांनी काम पाहिले. या निवडीसाठी कावनई येथील प्रकाश शिरसाठ, दिगंबर पाटील, राजू शेख, उत्तम येडे, रवी पाडेकर, रतन शेलार, गणेश पाटील, किरण पाटील, दिगंबर शिरसाठ, निलेश शिरसाठ, गणेश पाटील, किरण पाटील, दिंगबर शिरसाठ, संदीप दोंदे आदी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group