इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पोलीस पाटील पदाच्या १०० जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु : सविस्तर माहितीसाठी बातमीला क्लिक करा

इगतपुरीनामा न्यूज – उपविभागीय दंडाधिकारी, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर उपविभागातील रिक्त असलेली पोलीस पाटील भरण्याबाबत जाहीरनामा काढण्यात आला आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील उपविभागीय दंडाधिकारी, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर, उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील ( तालुका इगतपुरी व त्र्यंबकेश्वर एकुण 100 गावे) या गावात पोलीस पाटील पदभरतीसाठी अर्हताधारक अमेदवारांकडून विहीत नमुन्यात ऑनलाईन पध्दतीने अधिकृत अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरवात २९ सप्टेंबरला सकाळी दहा वाजेपासून सुरु होणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत ८ ऑक्टोबरला सायंकाळी पावणे सहा वाजेपर्यंत आहे. याबाबत अधिक माहितीसाठी खालील pdf डाउनलोड करू शकता. इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रिया माहिती खाली क्लिक करून डाउनलोड करा

Similar Posts

error: Content is protected !!