
प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१
मुकणे येथील महत्वाचा व अनेक पर्षांपासून प्रलंबित असणारा रस्ता अखेर काँक्रीटीकरण झाला आहे. यानंतर हा रस्ता रहदारीसाठी खुला करण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. पाडळी फाट्याकडे जाणाऱ्या खंडेराव मंदिराजवळ मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या मुकणे येथील सत्याई माता मंदिर ते कुंभारवाड्यामार्गे गावात जाणारा हा रस्ता करण्यात यावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांची मागणी होती. मात्र अनेक कारणांनी या रस्त्याचे काम होत नव्हते. ह्या कामासाठी घोटी बाजार समितीचे माजी संचालक विष्णु पाटील राव यांचे सततचे प्रयत्न, सरपंच हिरामण राव, उपसरपंच भास्कर राव आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे या रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला. लगेचच ह्या रस्त्याचे काम करण्यात येऊन तो रहदारीसाठीही खुला करण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
गेल्या अनेक वर्षांपासुन मागणी असतांना या रस्त्याचे काम होऊ शकले नाही. विष्णु पाटील राव यांच्या प्रयत्नांनी सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे झाल्याने त्यांचेही गावकऱ्यांनी आभार व्यक्त केले आहे. यावेळी सरपंच हिरामण राव, उपसरपंच भास्कर राव, ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती आवारी, पोपट राव, गणेश राव, मोहन बोराडे, ज्ञानेश्वर राव, पोपट वेल्हाळ, रामदास राव, ग्रामसेवक दीपक पगार आदींसह सर्व सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुकणे येथील १०० टक्के रस्ते काँक्रीटीकरण करण्यासाठी सरपंच हिरामण राव, उपसरपंच भास्कर राव आणि सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रयत्न सुरू आहेत. अनेक वर्षांपासुन मागणी असलेला हा रस्ता अखेर पूर्ण झाला असुन तो रहदारीसाठीही खुला करण्यात आला आहे.
– विष्णु पाटील राव, माजी संचालक