इगतपुरीनामा न्यूज – भारतीय संस्कृती आणि राष्ट्र उभारणीत शिक्षकांचे मोलाचे योगदान असून गुरूला सन्मान देणाऱ्या परंपरेची जोपासना केली जाते. त्यानुसार रोटरी क्लब ऑफ नाशिक ग्रेप सिटीकडून गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांना नेशन बिल्डर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी हा कार्यक्रम हॉटेल करी लिव्हज येथे मोठ्या दिमाखात पार पडला. अभय मुजुमदार यांनी सर्वांचे स्वागत केले. रोटरी क्लब ऑफ नाशिक ग्रेप सिटीचे अध्यक्ष जयंत खैरनार, डिस्ट्रिक्ट ट्रेझरर राजन पिल्ले, माजी अध्यक्ष अनिल देशमुख, जॉईंट सेक्रेटरी जयश्री पाटील, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी अंजली मेहता, उपाध्यक्षा रेणू पनीकर यांच्या हस्ते जिल्ह्यातील २१ गुणवंत शिक्षकांना पुरस्कार देण्यात आला. रोटरी क्लबचे अध्यक्ष जयंत खैरनार यांनी सर्व गुणवंत शिक्षकांच्या अद्वितीय कार्याचा गौरव करून अभिनंदन केले. यावेळी रागिणी रुपवते यांचे रोटरीच्या नवीन सदस्या म्हणून स्वागत करण्यात आले.
नूतन कोल्हे, अलका खैरनार, जलप्रभा देशमुख, जलउषा देशमुख, हरीश सोनवणे, चित्रलेखा कोठावदे यांनी पुरस्कारार्थीचा परिचय करून दिला. निवृत्त केंद्रप्रमुख श्रीराम आहेर यांनी गुणवंत शिक्षकांची निवड केली. पुरस्कारार्थी शिक्षकांमध्ये श्याम आदमाने शाळा खैरेवाडी, शिवाजी थेटे, बबिता घोती पिंपळगाव भटाटा, दगडुसिंग परमार शाळा भरवज, जगदीश खैरनार शाळा उभाडे, सविता गोसावी शाळा जामुंडे, वृषाली आहेर शाळा भगतवाडी, रेखा देवरे शाळा नागोसली, गजानन घरटे सावित्रीबाई फुले विद्यालय द्वारका, अमित शिंदे शाळा आनंदवल्ली, सुरेखा बोऱ्हाडे, भानुदास कांगुणे ज. वि. सातपूर, दादाजी अहिरे शाळा कोकणगाव, सारिका बाविस्कर वैश्यंपायन हायस्कुल नाशिक, सुनील आहेर शाळा शिरूर, नरेंद्र सोनवणे शाळा जऊळके, लता जाधव, मनोज दलाल शाळा पिंपळस, तिलोत्तमा बाविस्कर शाळा सारूळ, अरुणा पगारे शाळा महादेव वस्ती, नीता कोष्टी शाळा जयप्रकाश नगर यांचा समावेश आहे. सूत्रसंचालन माधुरी नेहरे यांनी तर आभार जयश्री पाटील यांनी मानले.