इगतपुरीनामा न्यूज – घोटी येथे आज श्री स्वामी समर्थ फर्टिलायझर येथे शेतकरी प्रभाकर जाधव व नंदू भोर यांना २६६ रुपये किंमतीचे युरिया खत ३०० रुपयाला विकल्याची माहिती कृषी विभागाला दिली दिली. कृषी विभागाच्या पथकाने तात्काळ दुकानावर धाड टाकुन शहानिशा केली असता खत विक्री परवाना गोठविला आहे. तपासणी अहवाल कारवाईसाठी खत पुरवठा अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे तसेच उर्वरित बी-बियाणे, औषधे आदींची दतपासणी केली आहे. पथकात उपविभागीय कृषी अधिकारी गोकूळ वाघ, तालुका कृषी अधिकारी रामदास मडके, मंडळ कृषी अधिकारी मनोज रोंगटे, के. एल. भदाणे आदींनी तपासणी करून कारवाई केली. यावेळी नारायण बाबा जाधव, पप्पू शेलार, कैलास जाधव, ज्ञानेश्वर भोर, शांताराम जाधव, प्रभाकर जाधव, राहुल भोर, गणेश गव्हाणे, निवृत्ती गव्हाणे, योगेश सुरुडे, बाळासाहेब जाधव आदी शेतकरी उपस्थित होते.
स्वराज्यचे उपजिल्हाप्रमुख महेंद्र शिरसाठ, तालुकाप्रमुख नारायणराजे भोसले, उपतालुकाप्रमुख सखाराम गव्हाणे, नारायण बाबा जाधव, शिवाजी काजळे, हरिभाऊ कुंदे, बाळू सुरुडे, योगेश शिंगोटे, दीपक खातळे, जालिंदर कारले, श्रीराम रणमाळे, शिवाजी गायकर, राहुल शेळके आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी वाढीव दराने रासायनिक खतांची विक्री होत असल्यास दुकानात दिलेल्या माझ्या क्रमांकावर निःसंकोचपणे संपर्क साधून तक्रार करावी. तात्काळ वाढीव दराने विक्री करणाऱ्या दुकानदार व परवानाधारकांवर कारवाई करून अंकुश ठेवला जाईल अशी माहिती कृषी अधिकारी के. एल. भदाणे यांनी दिली. शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची लूटमार स्वराज्य संघटना खपवून घेणार नाही. इगतपुरी तालुक्यातील कोणत्याही शेतकऱ्याची तक्रार येता कामा नये, अन्यथा पुढील काळात संघटना व्यापक पद्धतीने आंदोलन करून कारवाई करण्यास भाग पाडेल असा इशारा स्वराज्य तालुकाप्रमुख नारायणराजे भोसले यांनी दिला आहे.