इगतपुरीनामा न्यूज – गोंदे दुमाला येथील सिद्धिविनायक माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी कु. ज्योती भास्कर सोनवणे हिने इयत्ता दहावीत ९० टक्के मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. दुसरा क्रमांक कांचन दिलीप शेलार, तिसरा क्रमांक रोहिणी मोहन जाधव, चौथा क्रमांक राणी लक्ष्मण राव तर पाचवा क्रमांक गायत्री केरू ठाणगे हिने पटकावला. ज्योतीचे वडील इगतपुरीनामाचे संपादक भास्कर सोनवणे, आई माया सोनवणे, मुख्याध्यापक पांडुरंग देवरे, शिक्षक बाबासाहेब थोरात, नंदू नरोडे, किसन भोर, राजाराम गायकर, संजय धातडक, श्रीमती पाटील यांच्या योग्य आणि मोलाच्या मार्गदर्शनातुन ज्योती भास्कर सोनवणे हिने बाजी मारली. लहानपणापासून ज्योती हुशार असून वक्तृत्व स्पर्धा, गीत, चित्र काढणे आदी विषयात देखील पारंगत आहे. दहावीनंतर सायन्स विषयात प्रवेश घेऊन आयटी क्षेत्रात वाटचाल करणार असल्याचे तिने सांगितले. आमदार हिरामण खोसकर, काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, माजी आमदार निर्मला गावित, शिवराम झोले, बाजार समिती चेअरमन ज्ञानेश्वर लहाने, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके, काँग्रेस तालुकाध्यक्ष रमेश जाधव, बाजार समिती संचालक राजाराम धोंगडे, गोंदे दुमाला ग्रामपंचायत सरपंच शरद सोनवणे, माजी सरपंच गणपत जाधव, प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष निवृत्ती नाठे, राज्य आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी, इगतपुरी तालुक्यातील पत्रकार, लोकप्रतिनिधी आदींनी ज्योती भास्कर सोनवणे हिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group