इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील खंबाळे येथील घटना घडल्यावर घोटीचे पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सत्वरतेने १५ मिनिटात कर्मचारी रवाना करण्यात आले. त्यावेळी तातडीने घटनास्थळावरून आरोपी ताब्यात घेण्यात आला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. इगतपुरी न्यायालयात दुसऱ्या एका खुनाच्या केसमध्ये आरोपी रिमांड घेऊन आरोपीला पोलीस स्टेशनमध्ये ठेऊन तात्काळ धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी सदर ठिकाणी पाहणी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोनद्वारे माहिती दिली. घटनास्थळी डॉग स्कॉड, फिंगर प्रिंट, व न्याय वैधक विभागाला पाचारण करून घटनास्थळावरून सूक्ष्म पुरावे तात्काळ जमा केले. घोटीचे पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, डीवायएसपी कविता फडतरे यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन पाहणी केली. घोटी पोलीस ठाणे येथे तीन ते चार तास आरोपीकडे व इतर साक्षीदारांकडे कसून चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यानच्या कालावधीत काही लोकांनी अफवा पसरवून चुकीचे मेसेज पसरवले. यामुळे पोलिसांच्या प्रामाणिक तपासकार्यात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. यानुसार पसरत असलेल्या कोणत्याही चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये यासाठी पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी वस्तुस्थिती समजून सांगितली. तरीही काही लोक विनाकारण स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत अशी चर्चा सुरू आहे. अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, कुणाकडे घटनेसंदर्भात कोणतीही माहिती असल्यास अशा व्यक्तींनी समोर येऊन क्राईम ब्रँचकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. ह्या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सुरु असलेला तपास अधिकाधिक गतिमान व्हावा यासाठी पुढील क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. ह्या घटनेच्या मुळाशी जाऊन संबंधित असणाऱ्या आरोपींना कठोर शासन व्हावे यासाठी पोलीस कार्यवाही करीत आहेत.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group