इगतपुरीनामा न्यूज – बळीराजा हा देशाचा कणा आहे. त्याच्या प्रश्नांसाठी सदैव कटिबद्ध राहीन त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन देणार नसल्याचे लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे प्रणित शेतकरी पॅनलचे सोसायटी गटाचे उमेदवार शिवाजी शिरसाठ यांनी सांगितले. शेतकरी पॅनेलचा जोरदार झंजावात प्रचार आघाडीवर सुरू आहे. लोकनेते गोपाळराव गुळवे यांनी शेतकरी हितासाठी केलेले काम प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊनच घोटी बाजार समिती निवडणुकीत १८ उमेदवार मतदारांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी उमेदवारी करीत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची विविध पद्धतीने सोडवणूक करणारे दांडगा जनसंपर्क घेऊन कावनईचे शिवाजी शिरसाठ घोटी बाजार समितीच्या निवडणुकीत सोसायटी गटातून उमेदवारी करीत आहेत. शेतकरी विकास पॅनलतर्फे त्यांची उमेदवारी असून मतदानासाठी कपबशी ही निशाणी आहे. बाजार समिती निवडणुकीच्या प्रचारात लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनेल अग्रस्थानी असून, पॅनेलचे १८ उमेदवार पदाधिकारी कार्यकर्ते प्रचारातून आपली भूमिका मतदारांपर्यंत पोचवत आहे. ॲड. संदीप गुळवे यांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन विविध प्रकारचे प्रश्न सोडवणार असल्याचे शिरसाठ यांनी सांगितले. स्व. दादासाहेबांच्या कृपाशिर्वादाने शेतकरी पॅनलच निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोणत्याही भूल थापांना बळी न पडता येत्या २८ तारखेला कपबशी या निशाणीवर ठसा मारून शेतकरी विकास पॅनलला प्रचंड बहुमतांनी विजयी करा असे आवाहन करण्यात आले आहे.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group