इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातीप धामडकीवाडी येथे ॲडव्हेंचर एज्युकेशनल टूर दहिसर यांच्या समन्वयाने बोरिवली येथील वेबग्योर स्कुलच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी धामडकीवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली. शाळेचे मुख्याध्यापक तथा राज्य आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी यांनी प्रास्ताविकातून शाळेची माहिती व वाडीच्या लोकजीवनाची माहिती दिली. वेबग्योर स्कुल शिक्षक व विद्यार्थी यांनी दुर्गम भागातील शैक्षणिक उपक्रम समजून घेतले. वाडीतील कुटुंबांना भेट देऊन घनकचरा व्यवस्थापनाबद्धल ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. समाज प्रबोधन करणारी नाटिका सादर करून जनजागृती केली. यासह नृत्य व विविध कलागुण सादर करून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. वेबग्योर स्कुलच्या प्राचार्य अर्चना कुलकर्णी यांनी शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद परदेशी यांचे शैक्षणिक व सामाजिक कामाचे कौतुक करून शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला. शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थ यांना भरपेट सॅन्डविच, ज्युस, चॉकलेट व भेटवस्तू दिल्या. याप्रसंगी गोकुळ आगीवले, खेमचंद आगीवले, चांगुणा आगीवले, बबन आगीवले व ग्रामस्थ उपस्थित होते. वेबग्योर स्कुल व ऍडव्हेंचर एज्युकेशनल टूर यांचे दत्तू निसरड यांनी वाडीतर्फे आभार मानले.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group